लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे.

0 9

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

काल राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात काल  ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४८,७४,५८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.१९ % एवढे झाले आहे.

काल राज्यात २६,६१६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ५१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.