पाकिस्तानच्या बाबर आझमचा विश्वविक्रम, विराटला टाकले मागे

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात बाबरने नोंदवली मोठी कामगिरी

0 53

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने विश्वविक्रम प्रस्थापित करत विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबरने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान २००० धावा नोंदवण्याचा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात त्याने विराटला ओव्हरटेक केले. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बाबरने या विक्रमाला गवसणी घातली.

ही कामगिरी करण्यासाठी बाबरला ५२ डाव खेळावे लागले. तर, विराटने ५६ डावात २००० टी-२० धावा पूर्ण केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने ६२ डावात ही कामगिरी केली होती. तर, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६६ डाव खेळले होते.

वनडेत बाबर अव्वल

काही दिवसांपूर्वी, बाबर आझमने हा जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. 26 वर्षीय बाबरने तब्बल 1258 दिवस पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत ही कामगिरी केली. टी-२० क्रमवारीत बाबर ८४४ गुणांसह दुसऱ्या तर विराट ७६२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.