कोरोना काळात पाकिस्तानची भारताला मिळाली साथ, पाकमध्ये टॉप ट्रेंडमध्ये आहे #PakistanstandswithIndia

देशात कोरोनाची भयावह स्थिती झाली आहे, गेल्या २४ तासात ३ लाख पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

0 77

नवी दिल्ली :  देशात कोरोना(Coroan)ची भयावह स्थिती झाली आहे, गेल्या २४ तासात ३ लाख पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात रुग्णालयात कोरोना रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचे नातेवाईकांच्या डोळ्यातील पाणी अटत नाही.  कोरोना संख्या इतकी वाढत आहे, की रुग्णालय प्रशासन  रुग्णांना घरुनच उपचार घेण्यास सांगत आहेत. तर काही रुग्ण रुग्णालयाच्या समोरच आपला प्राण सोडत आहेत. प्राण सोडल्यानंतरही रुग्णाला दहन करण्यासाठी जागा मिळत नाही. दररोज मृत्यूची संख्या वाढत असून स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागत आहेत.

भारतातील ही विदारक स्थिती पाहून अनेक देश हळहळले आहेत. मात्र अशा परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. भारतातील ही विदारक स्थिती पाहून नेहमी विरोधात असलेल्या आणि आपला दुश्मन समजला जाणाऱ्या पाकिस्तान  देशात असे काही तरी घडतं हे पाहून मानवता अजून जिवंत असल्याचं आपल्याला जाणवेल. पाकिस्तान (Pakistan)मधून आता भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. शुक्रवारी रात्रापासून सोशल नेटवर्किंगवर खास करुन पाकिस्तानमधील सोशल नेटवर्किंग (Social Networking ) ट्रेण्डमध्ये #PakistanstandswithIndia म्हणेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे. (Pakistans support to India during Corona period)

पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी भारतांना धीर धरण्याचा, खचून न जाण्याचा सल्ला देताना #PakistanstandswithIndia हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी शेजरी म्हणून आम्ही या संकटाच्या कालावधीमध्ये भारतासोबत आहोत असे म्हटले आहे पाहुयात काही व्हायरल ट्विट

पाकिस्तानात टॉप ट्रेण्ड

Top first trend in Pakistan… #PakistanstandswithIndia

Thank You from india… pic.twitter.com/4OXQeoDK56

— Khiljii खीलजी خِلجی (@AbdullahUsmani) April 23, 2021

जीवन मरणाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्र रहायला हवं

Heartening to note that

#PakistanstandswithIndia is top Twitter trend here.. When it’s matter of life and death we must stand together and show humanity. Everyone I meet here in Pakistan is genuinely concerned about Neighbours.

— Waseem Abbasi (@Wabbasi007) April 23, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.