बाबा रामदेव यांची पतंजली बिस्किट कंपनी विकली; तब्बल इतक्या कोटींचा झाला सौदा

बाबा रामदेव यांच्या पतंजली बिस्किटांची मागणी झाली कमी? तब्बल इतक्या कोटींना विकली कंपनी

0 94

मुंबई बाबा रामदेव यांची पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (Patanjali Natural Biscuit Private Limited) ही कंपनी 60.02 कोटी रुपयांना रुची सोया इंडस्ट्रीज (Ruchi Soya Industries) कंपनीने विकत घेतली आहे. 10 मे 2021 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी बिझनेस ट्रान्स्फर अॅग्रीमेंटवर (Business Transfer Agreement) स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

कंपनी अधिग्रहणाची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रुची सोया इंडस्ट्रीजकडून ही रक्कम दोन हप्त्यांत दिली जाणार आहे. 15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता अॅग्रीमेंट क्लोझिंग डेटला दिला जाणार आहे. तसंच, उर्वरित 45 कोटी रुपयांचा हप्ता क्लोझिंग डेटपासून 90 दिवसांत दिला जाणार आहे.

रुची सोया कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारात काही काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग अॅग्रीमेंटचाही समावेश आहे. कंपनीचे कर्मचारी, तसंच कंपनीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची मालकीही हस्तांतरित होणार आहे. त्यासोबत, पतंजली बिस्कीट कंपनीच्या नावावर असलेली कर्जं, कंपनीची सर्व प्रकारची लायसेन्सेस, परमिट या सगळ्याच गोष्टी रुची सोया कंपनीच्या नावावर होणार आहेत. रुची सोया या कंपनीचा सध्याचा प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवणं, हा या कंपनी अधिग्रहणाचा उद्देश आहे.

रुची सोया ही कंपनी सध्या भारतात न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुची स्टार, सनरिच अशा ब्रँड्ससह कारभार चालवते आहे. रुची सोया ही कंपनी एके काळी कर्जात बुडाली होती. त्यानंतर पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीने 2019 साली ही कंपनी 4350 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यासाठी पतंजली कंपनीला 3200 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1200 कोटी रुपये, सिंडिकेट बँकेकडून 400 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 700 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 600 कोटी रुपये, तर अलाहाबाद बँकेकडून 300 कोटी रुपयांचं कर्ज पतंजली कंपनीने रुची सोयाच्या खरेदीसाठी घेतलं होतं.

त्यामुळे रुची सोया आणि पतंजली नॅचरल बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्या बाबा रामदेव यांच्याच आहेत. बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी 2006मध्ये पतंजली कंपनीची स्थापना केली होती. आता त्या कंपनीची 99.6 टक्के मालकी आचार्य बालकृष्ण यांच्या नावावर आहे. बाबा रामदेव कंपनीचे सहसंस्थापक आहेत. तसंच, रुची सोया या कंपनीत बाबा रामदेव नॉन एक्झिक्युटिव्ह नॉन इंडिपेंडंट डायरेक्टरही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.