बूलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला संगणक सीएमपी प्रणालीद्वारे अदा करा – ना.बच्चुभाऊ कडू,शालेय शिक्षण राज्यमंत्री

शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांनी पत्राद्वारे केली अंमलबजावणीची मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सुचना

0 17

संग्रामपुर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा विलंबाने होत असल्यामुळे बुलढाणा जिल्हयातील प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन संगणकाच्या एका क्लीकवर सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी दि.८ जुलै रोजी जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास,महिला व बाल विकास, इ.मा.व, सा.व शै.मा. प्रवर्ग, वि.जा., भ.ज. आणि वि.मा.प्रवर्ग कल्याण,कामगार कल्याण व शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्याकडे शिक्षकांच्या वेतनाची समस्या सोडविण्याबाबत निवेदना मार्फत मागणी केलेली होती.

सदर मागणीची शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांनी दखल घेऊन प्राथमिक शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी सीएमपी प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात पत्राद्वारे सुचीत केलेले आहे.

जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला शासन निर्णयानुसार होणे गरजेचे आहे परंतू संपुर्ण जिल्हयातील शिक्षकांचे वेतन दरमहा विलंबाने होत असल्यामुळे विविध कर्जाचे हप्ते वेळेवर न भरू शकल्याने शिक्षकांना दरमहा आर्थिक भुर्दड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सदर वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर करण्यात यावा असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांच्याकडे निवेदनामार्फत पाठपुरावा केलेला होता सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना सीएमपी वेतन प्रणाली नियमानुसार तात्काळ कार्यान्वित करण्यासंदर्भात परिपत्रकद्वारे कळविलेले आहे.

जिल्हयातील शिक्षकांचे वेतन दरमहा विलंबाने होत असल्यामुळे शिक्षकांना दरमहा अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,वेतन तरतुद पत्र पंचायत समित स्तरावर प्राप्त झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत बॅकेत वेतन पाठविण्याच्या प्रक्रियेत बराच कालावधी लागत असल्यामुळे वेतन विलंब होत आहे,सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करून सदर समस्याबाबत प्रहार शिक्षक संघटना स्वस्थ बसणार नाही,सदर समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे परंतू सदर समस्या प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने तात्काळ निकाली काढण्यात येणार आहे.

– महेंद्र रोठे
जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना,बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.