शेगाव : हातपाय बांधून प्रेत रेल्वे ट्रॅकवर टाकल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा पी सी आर २८ पर्यंत..

0 92

शेगाव: नागझरी येथील इसमाचा हातपाय बांधून प्रेत रेल्वे ट्रॅक वर टाकल्या प्रकरणातील आरोपी मृतकाची पत्नी व तिचा साथीदार अशा दोघांचा पीसीआर २८ एप्रिल पर्यंत न्यायालयाने वाढून दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की १८ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजे दरम्यान नागझरी येथील जुन्या क्रॉसिंग लाईनवर पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली सदर माहिती मिळताच शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर गोडे हे त्यांच्या इतर पोलिस कर्मचारी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले.

आरोपींना शोधण्यासाठी श्वान पथकाची सुद्धा मदत घेण्यात आली त्यावरून रामधन दांदळे या ४० वर्षीय इसमाचा खून त्याच्याच रेखा नावाच्या पत्नीने केल्याचे उघड झाले. शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर गोडे यांनी तत्काळ मृतकांची पत्नी व तिचा साथीदार संतोष साठे या दोघांना शेगाव रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला रेल्वे पोलीस विभागाचे मनमाड विभागाचे डी वाय एस पी डीजी काजवे यांनीसुद्धा घटनास्थळावर भेट दिली अटक केलेल्या दोन्ही आरोपींचा २५ एप्रिल पर्यंत शेगाव येथील न्यायालयाने मंजूर केला होता.

आज २५ एप्रिल रविवारी पी. सी.आर संपत असल्याने शेगाव रेल्वे पोलीस यांनी आरोपी रेखा राम दांदळे व संतोष साठे या दोन्ही आरोपींना शेगाव येथील न्यायालयात हजर करून न्यायालयाकडे पीसीआर वाढवून देण्याची विनंती केली न्यायालयाने सदर विनंती मान्य करून २८ एप्रिल पर्यंत दोन्ही आरोपींचा पीसीआर मंजूर केला सदर खून प्रकरणात अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.