5G नेटवर्क टेस्टिंगमुळे होतोय लोकांचा मृत्यू, कोरोना फक्त बहाणा? जाणून घ्या सत्य

PIBच्या फॅक्ट चेक टीमला दावा सपशेल खोटा आढळून आला. तसेच त्यांनी लोकांना आग्रह केला की कोरोना काळात कृपया असे खोटे मेसेज पसरवून लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका.

0 273

मुंबई: भारतात ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे त्याच वेगाने त्याच्याशी संबंधित अफवाही पसरत आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत सगळ्या मोठ्या अडथळा या अफवा आहेत ज्या लोक खऱ्या समजत आहेत आणि त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होत आहे. याच क्रमामध्ये सोशल मीडियावर एक ऑडिओ खूप वेगाने पसरत आहे ज्यात दावा केला जातोय की भारतात आतापर्यंत जितके मृत्यू होत आहेत त्याचे कारण ५ जी नेटवर्कच्या टेस्टिंगचे आहे. आणि त्याला कोरोना हे नाव दिले जात आहे. या ऑडिओमध्ये दावा केला जात आहे की ५ जी टेस्टिंगची माहिती सगळ्यांना देण्यात आलेली नाही आणि याच कारणामुळे लोकांचा अचानक मृत्यू होत आहे.

दरम्यान, या ऑडिओची पडताळणी केली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले. PIBच्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडियावर हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने लिहिले की एका ऑडिओ मेसेजमध्ये दावा केला जात आहे की राज्यांमध्ये ५जी नेटवर्कची टेस्टिंग केली जात आहे. याच कारणामुळे लोकांचा मृत्यू होत आहे.आणि याला कोविड १९ हे नाव दिले जात आहे.

दरम्यान,  PIBच्या फॅक्ट चेक टीमला दावा सपशेल खोटा आढळून आला. तसेच त्यांनी लोकांना आग्रह केला की कोरोना काळात कृपया असे खोटे मेसेज पसरवून लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका. या ऑडिओमध्ये दोन व्यक्ती बोलताना आढळत आहेत. यात एक व्यक्ती कोरोनामुळे होणारे मृत्यू हे ५जी टेस्टिंगमुळे होत असल्याचे सांगत आहे. तर या ऑडिओमध्ये सांगितले की याच कारणामुळे लोकांचा गळा सुकत आहे आणि दावा केला की मे पर्यंत याची टेस्टिंग झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

खरी हकीकत अशी आहे की कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि ५जी नेटवर्कच्या टेस्टिंगचा दूरपर्यंत काहीही संबंध नाही. तसेच असा कोणताही वैज्ञानिक दावा नाही की ५जी टेस्टिंगमुळे लोकांचे मृत्यू होत आहे. यासाठी सर्व वाचकांना अशी विनंती आहे की असे व्हायरल मेसेज कोणालाच फॉरवर्ड करू नका. तसेच अफवांपासून स्वत:चा बचाव करा आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत डटून उभे राहा.

Leave A Reply

Your email address will not be published.