Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

0

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी मंगळवारी पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी प्रतिलिटर स्वस्त झाले होते. गेल्या आठवड्यातही इंधनाच्या दरात 2 वेळा कपात करण्यात आली. एप्रिल महिन्यासाठी स्वयंपाकाचा गॅस देखील प्रति सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला आहे. (Petrol Diesel Price Today on 01 April 2021 latest price Update fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अवघ्या काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.56 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 96.98 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.77 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.58 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 88.91 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.87 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.96 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.75 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 85.88 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.33 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 01 April 2021 latest price Update fuel rates)

Leave A Reply

Your email address will not be published.