वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे.

0 29

Petrol Price Latest Update नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर (crude oil prices) ठरत असल्याचं सांगत आहे. इंधनाचे दर कधी कमी होणार, दर कमी होणार की नाही, असे प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. (Petrol Price Diesel rates Latest Update no relief till this year prices may goes above 125 rupees)

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे. आता सर्वांच्या नजरा 1 जुलैला होणाऱ्या OPEC+ देशांच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यामध्ये उत्पादन धोरणावर निर्णय होणार आहे. रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे.

125 रुपयांपर्यंत पेट्रोल दर पोहोचणार?

जर OPEC+ देशांच्या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतात लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, याचा दबाव सरकारवर आहे. त्यातच सरकारने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून इंधनाचे दर कमी केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लिटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पेट्रोलचे दर आणखी वाढणार

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम सर्वांवर होतो. त्यातच महसूल घटल्यामुळे सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. परिणामी पेट्रोलचे दर वाढणार असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कच्चे तेल 100 डॉलरपर्यंत पोहोचणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत जूनच्या सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे. पाहता पाहता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. पुढील वर्षापर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपर्यंत पोहोचतील, असा अंदाज बँक ऑफ अमेरिकाने वर्तवला आहे.

इराण आणि अमेरिका वाद

इराणवर अमेरिकेने लादलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत राहतात. जर इराण आणि अमेरिका यांच्यात अणू कराराबाबत काही सहतमी झाली, तर अमेरिका इराणवरील बंधनं कमी करु शकते. त्यामुळे इराणकडून इंधनाचा पुरवठा वाढवला जाऊ शकतो. मात्र दोन्ही देशांकडून याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.