PM Modi Birthday: दिल्लीत ‘५६ इंच’ थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

Pm Narendra Modi Birthday Delhi Restaurant 56 Inch Thali

0

PM Modi Birthday

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या म्हणजे १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे. या थाळीमध्ये ५६ पदार्थ असतील, ज्यामध्ये व्हेज-नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचे पदार्थ ग्राहकांना मिळणार आहेत.

दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ही थाळी मिळणार आहे. या विषयी बोलताना या हॉटेलचे मालक सुमित कलारा यांनी सांगितलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. ते आपल्या देशाची शान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना एक अनोखी भेट देऊ इच्छितो. म्हणून आम्ही एका भव्य थाळी निर्माण करत आहोत. या थाळीचं नाव ५६ इंच असं असेल. आम्ही ही थाळी त्यांना भेट देऊ इच्छितो आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इथे येऊन खावी. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थकांना विनंती करतो की ज्यांचं मोदींवर प्रेम आहे, त्यांनी यावं आणि या थाळीचा आस्वाद घ्यावा.

हॉटेलच्या मालकाने या खास थाळीवर अनेक बक्षिसंही ठेवली आहेत. जर कोणत्याही जोडप्यापैकी एकाने ही थाळी ४० मिनिटांच्या आत संपवली, तर त्या व्यक्तीला साडे आठ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. तसंच या थाळीवर केदारनाथ यात्राही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जाऊन आपल्या आईचा आशिर्वाद घेतील. त्यानंतर ते मध्यप्रदेशला जातील, तिथे कूनो नॅशनल पार्कमध्ये जातील जिथे नामिबियातून ८ चित्ते आणले जाणार आहेत. तर भाजपाकडून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.