औरंगाबाद : दारूच्या नशेत रेशन दुकानदाराची अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा; गुन्हा दाखल

पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत पानवी (ता. वैजापूर) येथील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा साठा कमी आढळून आल्याने दुकानदाराविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्यात आली.

0 4

औरंगाबाद :  पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत पानवी (ता. वैजापूर) येथील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा साठा कमी आढळून आल्याने दुकानदाराविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्यात आली. त्यावरून पानवी येथील दुकानदाराविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तु कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तहसीलदार राहुल गायकवाड यांनी पानवी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२६ ची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे यांनी २१ मे रोजी दुकानदार बाहेती यांच्या दुकानाची तपासणी केली. या वेळी दारुच्या नशेत बाहेती यांनी अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा केली. याशिवाय दुकानात भाव फलक नसणे, दक्षता समिती सदस्य फलक नसणे, लाभार्थ्यांच्या याद्या नसणे अशा अनेक त्रुटी आढळुन आल्या. तसेच, दुकानात पुरेसा साठाही नव्हता. हा अहवाल प्रशासनाला सादर केल्यानंतर दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.