क्रिकेट बेटींगवर पोलिसांची कारवाई; १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Police raid on cricket betting : मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे.

0 0

शेगाव: शेगाव-खामगाव रोडवरील शिवराज फॉर्म हाऊसमध्ये आयपीएलवर जुगार खेळविल्या जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांना मिळाल्यावरून मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेट जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत लासुरा फाट्याजवळील शिवराज फॉर्म हाऊसमध्ये आयपीएलवर जुगार खेळविल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी रात्री ८ च्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली.

या धाडीत आरोपी आकाश शेळके,गणेश मनोहर बोरे (२८, रा. मोठी देवीजवळ, जलालपुरा खामगांव) आणि विशाल राजेश बोबडे (३६, रा. बोबड़े कॉलनी खामगांव) हे क्रिकेटवर जुगार खेळत व खेळवीत असलयाचे दिसून आले.

त्यांच्याकडून नगदी रोख४,०१० रुपये, १३ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, एक टी.व्ही , सेटटॉप बॉक्स, जुने दोन रिमोट, मोबाईल चार्जर, जुनी बॅग, कॅल्क्युलेटर असा एकुण १ लाख ५४ हजार ९५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला, याबाबत चद्रकांत दिलीपराव बोरसे फौजदार अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसात अप क्र – ८४/२०२१ कलम ४५, महाराष्ट जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.