शेगांव बाळापूर रोडवरील “हॉटेल अंबर”वर पोलिसांचा छापा.. देहव्यापार करतांना २ आरोपींना अटक

0 215

दि. २४ एप्रिल शनिवारी रात्री १० वाजता शेगांव शहर पोलिसांनी बाळापूर रोडवरील अंबर लॉजवर छापा टाकला असता दोन जण देहविक्री करताना आढळले. ही घटना २४ एप्रिल शनिवारच्या रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये अंबर लॉजिंग व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे वय २३ वर्षे राहणार म्हाडा कॉलनी शेगाव व ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे वय ३० वर्ष राहणार मोरगाव भाकरे जिल्हा अकोला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शेगांव शहरातील बाळापूर रोडवर असलेल्या अंबर लॉजमध्ये बेकायदेशीर देहविक्री चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना गुप्त बातमी दाराकडून मिळाल्या नुसार शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर असताना अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत खामगाव यांच्या पथकातील महिला अंमलदार व अधिकारी पीएसआय बोरसे हे आनंद सागर रोडवर उभे असून त्यांना अंबर लॉजवर देहविक्री चालू असल्याची खात्रीलायक बातमी बातमीदाराकडुन मिळाली व ते ग्राहक म्हणून आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष टाले यांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या सोबत महिला अंमलदार व पोलीस स्टाफ यांनी  आनंद-सागर समोरील हॉटेल अंबर लॉजवर छापा मारून कारवाई केली असता त्यामधे एक महिला व अंबर हॉटेल व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे आणि ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे असे दोन जण देहव्यापार करतांना मिळून आले. यावेळी आरोपीं जवळून नगदी ४ हजार ४०० रुपये एक कंडोम पाकिट किंमत २० रु आणि अनवॉंन्टेड गोळ्यांचे पाकिट ज्यामध्ये १७ गोळ्या किंमत ६० रुपये असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनैतिक व्यापार करताना मिळून आल्यावरून शेगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 3,4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1959 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले आहेत.

What’s your Reaction?

Leave A Reply

Your email address will not be published.