“देशाला लागलेली सगळ्यात मोठी कीड म्हणजे राजकारण”; तेजस्विनी पंडितने व्यक्त केला संताप

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता विविध स्तरावरून सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण तर दुसरीकडे तापलेले राजकारणामुळे आता अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही आपल्या ट्विट आकाउंड वरून संताप व्यक्त केला आहे.

तेजस्विनी पंडितने आपल्या ट्विट अकाउंटवरून एक ट्विट शेअर केले आहे. ज्यात ती म्हणाली की, “सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’ ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच.काळजी घ्या.” असे तेजस्विनी पंडीतने आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

दरम्यान, “महाराष्ट्रात कोरोना जास्त असताना लसींचा पुरवठा कमी का?” असा सवाल याआधी प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकने सरकारला केला होता. तसेच याआधी अनेक कलाकारांनी असा संताप सरकारवर व्यक्त केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.