
शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची प्रहार शिक्षक संघटनेची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शिक्षकांच्या समस्या निवेदनामार्फत सोडविण्याची मागणी
शेगांव
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत दि.५ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने शालेय पोषण आहाराची नोंदवही दरवर्षीप्रमाणे क्रमांक१ ते ४ सर्व शाळांना उपलब्ध करून देणे,शिक्षकांचे मुळसेवापुस्तक व दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी तालुकास्तरीय कॅम्पचे आयोजन करणे,डिसिपीएस धारक शिक्षकांची दरमहा कपात करण्यात आलेली मागील व चालू वर्षातील संपुर्ण रक्कम एन.पी.एस. खात्यात जमा करणे,सन २०२१ – २०२२ या आर्थिक वर्षांच्या भविष्य निर्वाह निधीची स्लीप शिक्षकांना वितरीत करणे,चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे,शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फोलिक अॅसिड टॅबलेटचा पुरवठा आरोग्य विभागामार्फत करणे,सन २०२१-२०२२ चे गोपनीय अहवाल (सी.आर.) शिक्षकांना वितरीत करणे आदी समस्या निवेदनामार्फत सोडविण्याची मागणी निवेदनामार्फत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी केली आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे अर्जुन गिरी,प्रशांत नागे,अजय जुमळे,सचिन गावंडे,सचिन वडाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.