लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या कापड दुकानावर कार्यवाही दुकानावर दंडात्मक कार्यवाही

0 0

शंकरपूर :
राज्य शासणाने कोरोणा संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रना करीता ब्रेक द चैन अंतर्गत जिवणावश्यक वस्तु शिवाय इतर सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद करण्याचा निर्णय घेतला.मात्र येथील बालाजी रेडिमेड दुकान घरी नेऊन विक्री करीत असल्याने दंडात्मक कारवाही करण्यात आली। या अगोदर ग्रामपंचायत प्रशासणाने त्यांना ताकीद दिली होती तथा मागील वर्षी च्या लाकडाऊन मध्ये दंड आकारला होता .
येथे कोविड १९ कोरोणा विषाणु संसर्गांचा आकडा वाढत चालला.त्यामूळे राज्य शासणाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमल बजावणी करण्या करीता ग्रामपंचायत प्रशासणाने कंबर कसली आहे. बालाजी रेडिमेड चे मालक अश्विन नंदनवार यांनी दुकानातील सामान घरी नेऊन दुकान थाटले होते व ग्राहक करीत होते दि 15 ला ही माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच त्यांनी धाड टाकून पकडले परंतु त्या दिवशी त्याच्यावर कोणतीही कारवाही न करता समज देण्यात आली आज शुक्रवारी पुन्हा ग्राहक करीत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली त्यामुळे आज पुन्हा धाड मारण्यात आली तेव्हा तिथे ग्राहक असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्यावर 15 हजार रुपयांची दंडात्मक कारवाही करण्यात आली हे 15 हजार रुपये देण्यास नकार दिल्याने माल जप्त करण्याची कारवाही करण्यात आली परंतु नंतर त्यांनी 15 हजार रुपये नगदी दिल्याणे जप्ती ची कारवाही थांबविण्यात आली ही कारवाही उपसरपंच अशोक चौधरी सदस्य मस्जिद शेख संजय ननावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पोलीस कर्मचारी नागरगोचे माजी ग्रामपंचायत सदस्य गोकुल सावरकर ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कोरडे सादिक शेख आदींनी केली

सर्व व्यापारी तथा जनतेनी कोरोणाची साखळी तोडण्याकरीता शासणाच्या दिशा निर्देशाचे पालन करावे .सर्व व्यापारी बंधूनी ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे
अशोक चौधरी उपसरपंच शंकरपूर

Leave A Reply

Your email address will not be published.