म्युकोरमायकोसिसचा रुग्णांना मोफत उपचार द्या

- भाजप शहराध्यक्ष केलनका यांची मागणी तभा वृत्तसेवा गोंदिया

0 5

कोरोना इतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे. या आजारावर मोफत उपचार केले जावेत, अशी मागणी गोंदियाचे भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका यांनी केली आहे.

कोरोनासारख्या भयंकर आजारावर नियंत्रण ठेवता आले असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या डोळ्यांचा आजार म्युकरमायकोसिस या आजाराने रुग्ण त्रस्त झाले आहेत. या आजारावरील उपचाराकरिता लागणारी औषधे महागडी असल्याने गरीब आणि सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत. त्यामुळे या आजारावरील औषधे आणि उपचार मोफत केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.