प्रलंबित वैद्यकीय देयकाची रक्कम प्रदान करा.

0 11

 

शेगांव : 
पंचायत समिती शेगांव अंतर्गत अनेक प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकीय देयके प्रलंबित आहेत.
सदर वैद्यकीय देयके निकाली काढून सदर देयकाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी याकरिता लेखाधिकारी पंकज सोळंके यांच्याशी चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेकडे सदर शिक्षकांचे वैद्यकीय देयके मंजुरीस्तव पाठविण्यात आलेले असुन सदर देयके प्राप्त होताच प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकीय देयके अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन लेखाधिकारी पंकज सोळंके,वरिष्ठ सहाय्यक शिक्षण ( विभाग ) शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुका अध्यक्ष सुनिल घावट,राजु घोगरे आदि पदाधिकारी उपस्थित होते

लेखाधिकारी पंकज सोळंके यांच्याशी वैद्यकीय देयके निकाली काढण्यासंदर्भात चर्चा करतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व आदी पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.