शिक्षकांच्या वैद्यकीय देयकाची तरतुद तालुकास्तरावर वितरीत करतांना कोणतीही अनियमीतता न होता विनाविलंब निधी शिक्षकांच्या खात्यात जमा करावा….

- महेंद्र रोठे, जिल्हाध्यक्ष,म.रा.शिक्षक सेना बुलडाणा

0

शेगांव
शिक्षकांची वैद्यकीय देयके मंजुर करण्यात आलेल्या दिनांकानुसारच शिक्षकांना रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) सचिन जगताप यांचेकडे केलेली आहे.

राज्यामध्ये कोरोना संसर्ग परिस्थिती उद्भवल्यामुळे गत एक वर्षापासुन पगारा व्यतिरीक्त कोणत्याही देयकाची तरतुद शासन स्तरावरुन प्राप्त नव्हती त्यामुळे जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील असंख्य वैद्यकीय देयके व इतर देयके मंजुर झालेली होती परंतु तरतुद अप्राप्त असल्यामुळे सदर देयके प्रलंबीत होती.

वैद्यकीय देयकाची अदा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतुद जिल्हास्तरावर प्राप्त झालेली असुन शक्य तितक्या लवकर तालुकानिहाय सदर रक्कम वितरीत करण्यात येणार आहे यासंदर्भात शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) सचिन जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असता तालुकास्तरावर शिक्षकांचे वैद्यकीय देयकाची तरतुद वितरीत करतांना कोणतीही अनियमीता होणार नाही या करिता शिक्षकाचे वैद्यकीय देयके मंजुरी दिनांकाच्या क्रमानुसारच अदा करण्यात यावे अशी आग्रही भुमीका शिक्षक सेनेच्या वतीने घेण्यात आली असता सदर न्याय मागणी शिक्षणधिकारी ( प्राथ. ) सचिन जगताप यांनी तात्काळ मंजुर करून त्यासंदर्भात आदेश तेराही तालुक्यांना निर्गमीत करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले आहे.

पूर्वानुभव पाहता असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही अथवा जाणीवपूर्वक शिक्षकांची देयके विलंबाने वितरीत करण्यचे प्रकारही तालुकास्तरावर होत असतात त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आले तर अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षक सेनेच्यावतीने केलेले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा लेखा विभाग,शिक्षण विभाग यांचे कडुन पडताळणी होऊन व मा.शिक्षणाधिकारी यांचे मंजुरी आदेशान्वये वैद्यकीय देयके मंजुर होऊनही तालुकास्तरावर शिक्षकांच्या खात्यात त्यांचे दवाखान्यात औषधोपचारावर खर्च झालेली हक्काची रक्कम शिक्षकांना अदा करण्यासंदर्भात विलंब होतोच कसा ? असा सवालही जिल्हाध्यक्ष यांनी याप्रसंगी उपस्थित केला आहे .सदर वैद्यकीय देयके अदा करतांना जिल्हयातील कोणत्याही तालुक्यात जर जाणीवपूर्वक विलंब झाला,अन्याय झाला तर शिक्षक सेना सदर बाब कदापीही सहन करणार नाही असा ईशाराही जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी दिला आहे.

” जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर वैद्यकीय देयाकाची तरतुद वितरित करतांना कोणतीही अनियमितता करण्यात येऊ नये,असे शिक्षकांना अन्याय होत असल्याचे जाणवल्यास जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. ”

– महेंद्र रोठे
जिल्हाध्यक्ष ,म.रा.शिक्षक सेना बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.