भारतात PUBG Lite चा Game Over! २९ मेपासून प्लेयर सपोर्टही होणार बंद

भारतात आता पबजीच्या लाइट व्हर्जनचाही 'गेम ओव्हर'

0 13

भारतात आता पबजीच्या लाइट व्हर्जनचाही ‘गेम ओव्हर’ झाला आहे. PUBG Lite च्या डेव्हलपर्सनी गेल्या महिन्यातच २९ एप्रिलपासून जगभरात PUBG Lite ची सेवा कायमस्वरुपी बंद करणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात lite.pubg.com वेबपेज बंद केलं जाईल, त्यानंतर २९ एप्रिलला सेवा बंद केली जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं.

कमी क्षमतेच्या सिस्टिमसाठी डिझाइन केलेला PlayersUnknown Battleground (PUBG) गेमचा ‘लाइट व्हर्जन’ गेम PUBG Lite २९ एप्रिलपासून कायमस्वरुपी बंद होणार आहे. तर, २९ मेपासून PUBG Lite साठी प्लेयर सपोर्ट मिळणं देखील बंद होईल. अत्यंत विचार करुन हा गेम बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचं कंपनीने सांगितलं.

गेम बंद झाल्यानंतरही पुढील सूचना मिळेपर्यंत PUBG Lite चं फेसबुक पेज सुरू राहणार आहे. कंपनीने L-COIN (पेड कॅश) टॉप-अप सिस्टिम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंद केली होती, त्यानंतर हा एकप्रकारे पूर्ण फ्री गेम झाला होता. नोव्हेंबरपासून गेममधील सर्व कंटेंट फ्री झालं होतं. पण, आता मात्र पबजी प्रेमींना PUBG Lite गेम खेळता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.