‘बाय बाय डिप्रेशन- सॉरी गुड्डी’ फेसबुक पोस्ट करत विहिरीत उडी मारुन पुण्यात शिक्षकाची आत्महत्या

फेसबुकवर 'बाय बाय डिप्रेशन' असा मेसेज लिहून पुण्यातील शिक्षकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावातील एका शेतातील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. (Pune Commins College professor praful meshram Commit Suicide)

0 24

पुणे : फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन’ असा मेसेज लिहून (Suicide Note) पुण्यातील शिक्षकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावातील एका शेतातील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. प्रफुल दादाजी मेश्राम Praful Meshram (वय 45) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पुण्यात शिक्षकाची आत्महत्या

प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात (Commins College Pune) नोकरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. एका आजारातून ते नुकतेच बाहेर पडले होते. गेले काही दिवस ते कुणाशीही बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी फेसबुक पोस्ट

मंगळवारी दुपारच्या सुमारास ‘बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी’ अशी एक पोस्ट लिहून भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं. फेसबुकवरील पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्यांनी अखेरचं पाऊल उचललं होतं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी शोधाशोध सुरु केली. काही तासाने एका व्यक्तीने विहिरीत आत्महत्या केल्याचं वृत्त आलं. पोलिस घटनास्थळी गेले असता मेश्राम यांचा मृतदेह असल्याचं समोर आलं.

पोलिसांचा तपास सुरु

कुटुंबियांना याबाबतची माहिती कळवली आहे. आता या आत्महत्येमागचं नेमकं काय कारण असावं? कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली असावी, याचा तपास सासवड पोलिस करत आहेत.

(Pune Commins College professor praful meshram Commit Suicide)

Leave A Reply

Your email address will not be published.