पुण्यातील काका हलवाई दुकानाला लागली आग

अग्निशमन दल काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले

0 9

पुण्यातील शास्त्री रोड वरील काका हलवाई दुकानाला आग लागण्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री रोडवरील ‘काका हलवाई स्वीट होम’च्या आतील बाजूला एक ऑफिस आहे. त्याला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आतील ऑफिस जळून खाक झाले होते.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता असून तीन गाड्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.