VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले ( BJP MLA Mahesh landge Dance)

0 3

पिंपरी चिंचवड : भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh landge ) बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे. (Pune Pimpri Chinchwad BJP MLA Mahesh landge Dance in Daughter Sakshi Landge Wedding)

भंडारा उधळत आमदार लांडगेंचा डान्स

भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला.

कोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका

दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

कोण आहेत महेश लांडगे?

महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष
भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात
2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश
राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख
( BJP MLA Mahesh landge Dance)

पाहा व्हिडीओ :

Leave A Reply

Your email address will not be published.