‘साहेब! कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलंय..’ पुण्यात पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार

0 82

पुणे : पुण्यातील एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे की, एका कंपनीने दिलेला आहार घेतल्यानंतर त्यांच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोक्षी म्हणाले, ‘तक्रारदार पोल्ट्री फार्मचा मालक आहे. त्यांना तसेच आणखी चार जणांना अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी पोलिसांत ही तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही, कारण संबंधित कंपनीने अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करणाऱ्या 3 ते 4 पोल्ट्री फार्मच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कंपनीकडून कोंबड्यांची खरेदी केली. मोक्षी म्हणाले, “त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की हा आहार खाल्ल्यानंतर त्यांच्या फार्मच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं.” ते म्हणाले की, पोलिसांनी अहमदनगरच्या विभागीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी या विषयाबाबत चर्चा केली.

Pune poultry farm owner lodged a complaint in police because hens Stopped laying Eggs

Leave A Reply

Your email address will not be published.