चॉकलेटच्या आमिषाने पुण्यात बालिकेवर बलात्कार, नराधम दोन महिन्यांनी जेरबंद

आरोपी संदीप भरत ढमाले याने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते (Pune Man Raped minor girl)

0 2

पिंपरी चिंचवड : अल्पवयीन तरुणीला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर भागात दोन महिन्यांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली होती. लैंगिक अत्याचारानंतर पसार झालेल्या आरोपीला खेड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Rajguru Nagar Man Raped minor girl luring by chocolate arrested after two months)

मार्च 2021 मध्ये बालिकेवर अत्याचार

आरोपी संदीप भरत ढमाले याने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर हा प्रकार कुणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. मार्च 2021 मध्ये ही घटना घडलेल्या दिवसापासून आरोपी संदीप भरत ढमाले पसार झाला होता

दोन महिने लोकेशन बदलून गुंगारा

आरोपी संदीप हा स्वतःजवळ मोबाईल बाळगत नव्हता. वारंवार तो स्वतःचं लोकेशन बदलत होता. मात्र गुप्त बातमीदाराकडून शनिवारी रात्रीच्या सुमारास संदीप पुण्याजवळील नऱ्हे आंबेगाव भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे खेड गुन्हे शोध पथकाने त्याला अटक केली. आरोपी संदीप भरत ढमाले याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महिलेशी अश्लील चाळे, विद्यार्थ्याला अटक

दुसरीकडे, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला नागपुरात अटक करण्यात आली आहे. 27 वर्षीय आरोपी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपी सुरजने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला.

मुंबईत बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचा आरोप

दरम्यान, बॉलिवूड फोटोग्राफरवर मुंबईतील मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. अंधेरीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रख्यात चित्रपट निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि एका निर्मात्याचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.