कोल्हापूर रेल्वे संदर्भातील प्रश्न मार्गी लागणार – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर रेल्वे संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.

0

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले. येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, उपव्यवस्थापक दिव्यकांत चंद्राकर उपस्थित होते.

मध्यवर्ती बसस्थानक आणि राजारामपुरी परिसराला जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिजचे नियोजन, प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, विद्युतीकरणाचा विस्तार तसेच परीख पुलाबाबत चर्चा करण्यात आली.

पाटील म्हणाले,की कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – सातारा, कोल्हापूर – मिरज दरम्यान डेम्यू गाडय़ा चालवणे, कोल्हापूर – पुणे दुहेरीकरणाचे काम आणि विद्युतीकरणाला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून कोल्हापूर रेल्वेचे सर्व प्रश्न लवकर मार्गी लागतील. श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आणखी एका वातानुकूलित डब्याची मागणी केली आहे. स्थगित गाडय़ांची सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.