‘कोरोनाची ही लाट आधीपेक्षा मोठी…’, राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना

मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांची कृष्णकुंजवरून पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काय चर्चा झाली याबाबत भाष्य केलं.

0

मुंबई, 06 एप्रिल: मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांची कृष्णकुंजवरून पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काय चर्चा झाली याबाबत भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे असं म्हणाले की काल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. लॉकडाऊनबाबत भेटण्याासाठी मी त्यांना विनंती केली होती, पण त्यांच्या आजुबाजूल कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने ते क्वारंटाइन आहेत. त्यामुळे आमच्यात झूमवर बोलणे झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी काय बोलणं झालं हे सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी असल्याची चिंता राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी जास्त का? याबाबतही राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘पुन्हा एकदा लॉकडाऊन पसरलं आहे आणि पेशंट्स वाढत आहेत. किंबहुना (हा शब्द वापरला तर चालेल ना) आधीच्या लाटेपेक्षा ही लाट मोठी आहे’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. हे चित्र महाराष्ट्रातच का दिसंतय याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. याठिकाणी बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर राज्यांमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना किंवा कोरोनाची लाट नाही आहे. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र आहे. याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्रात बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसंच इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण मोजले जात नाहीत. ते मोजले तर खरे आकडे समोर येतील.’

या समस्येबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मी मागणी केली होती की, जे लॉकडाऊनमध्ये बाहेरच्या राज्यात गेले आहेत ते परतले की त्यांची मोजणी करा आणि चाचणी देखील करा. त्यांची मोजणी झालीच नाही.’

राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

Leave A Reply

Your email address will not be published.