“कोरोना साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ” राजेश टोपेंनी दिले संकेत

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज असल्याचे सर्व स्तरावर बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची रुग्ण संख्या बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा अट्टहास केला होता. मात्र आता यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रात आता लॉकडाऊन अटळ आहे. राज्यात लॉकडाऊनची तयारीही सुरू झाली आहे. जवळजवळ समाजातील सर्व घटकांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. जवळजवळ सर्वांचे म्हणणे आहे की, राज्यात लॉकडाऊन लावायची गरज आहे. दारिद्रय रेषेखालील लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. शेवटी मुख्यमंत्री लवकरच लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेतील.” असे टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षिय नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्यात राज्यात ८ ते १५ दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे उद्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. असेही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.