बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी काय करावं? रणवीर सिंगनं दिला कानमंत्र

अनेक चित्रपटांचे पुरस्कार आपल्या नावावर करणारा अभिनेता रणवीर सिंग ने नवोदित तसेच आउटसाइडर्स व बॉलिवूड मध्ये य़ेऊ इच्छिणाऱ्यांना विशेष सल्ला दिला आहे.

0 15

मुंबई :  बॉलिवूड तसेच सिनेविश्वात येण्याची अनेकांची इच्छा असते. अनेकजण त्यात सफल होतात तर काहीजण हे असफल ठरतात. विशेषत: कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्यांसाठी हा प्रवास फारच कठीण ठरतो. बॉलिवूडमध्ये सध्या प्रंचड चर्चेत असणारा व अल्पावधीतच अनेक पुरस्कार आपल्या नावावर करणारा अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)  ने नवोदितांसाठी विशेष सल्ला दिला आहे.

एका मुलाखतीत रणवीरला त्याच्या स्टारडमच्या (stardom) प्रवासाविषयी विचारल असता त्याने सांगितल, जेव्हा तरूण अभिनेते, विशेषता आऊटसाइडर्स (outsiders) माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात की या स्ट्रगल मधून पुढे कसं जायच, तेव्हा मी सगळ्यात आधी त्यांना सांगतो की कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कारण पाहीजे. यासाठी करा की तुम्हाला ते करायला आवडतं.

“मी हाच आग्रह धरतो की, परफॉर्मिंग आर्ट किंवा मनोरंजन क्षेत्रात कोणतही लालच किंवा आकर्षण घेऊन येऊ नका. कारण या क्षेत्रात यश हे नाव आणि पैशांसोबत मिळतं. या गोष्टी अगदी क्षणिक आहेत आणि झगमगत्या आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुमच्या कामात प्रामाणिक रहा आणि काम तुमच्या परफॉर्मन्स मिळालेल्या आनंदासाठी करा.”

पुढे रणवीर म्हणतो, “मी माझ्या या प्रवासातून आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे खरेपणाची गूंज सगळ्यात जास्त असते. जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करत आहात जे तुम्ही नाही आहात तर तुम्ही स्वताला धोका देत आहात. जर तुम्ही जसे आहात तसेच राहीलात तर जज करण्याची भीती तुम्हाला वाटत नाही. तेव्हाच तुम्ही तुमची पुर्ण शक्ती दाखवू शकता. जितकी मोठी जोखिम तितकं मोठं इनाम. या प्रक्रियेत तुमचे पाय लडखडू शकतात. पण असफलता असं काहीत नसतं तर केवळ शिकवणी असतात.”  असा सल्ला रणवीर ने दिला आहे.

रणवीर ने बँड बाजा बाराती या चित्रपटातून त्याच्या करिअर ला सुरुवात केली होती. बाजीराव मस्तानी (Bajirao mastani), रामलीला (Ramleela) , पद्मावत (padmavat) , गली बॉय (gullyboy) हे त्याच्या करिअरचे सुपरहिट चित्रपट आहेत. लवकरच तो 83 , सुर्यवंशी, जयेशभाई जोरदार, सर्कस या आगामी चित्रपटांत तो दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.