मच्छिद्रखेड येथे ४१ ग्रामस्थांची कोरोना संसर्गाची रॅपिड टेस्ट

0 0

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या ग्राम मच्छिद्रखेड येथे दि.१० एप्रिल रोजी कोरोना संसर्गाच्या बाधेसंदर्भातील ४१ ग्रामस्थांची रॅपिड टेस्ट चाचणी करण्यात आली.

एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची बाधा झाली किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी चाचणी हा एकमेव पर्याय आहे.या कार्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.

ग्रामस्थांची रॅपिड टेस्टची नोंदणी करतांना अंजली सोनार ( ANM ) आरोग्य विभागातील कर्मचारी

सदर चाचणीकरिता डॅा.ललित राठोड ( CHO ) आरोग्य सेवक एस.आर.भोंबळे ( ANM )श्रीमती अंजली सोनार,श्रीमती सुनिता ससाणे ( आशा ) तसेच सरपंच भारंबे उपसरपंच खंडारे व आदी नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.