खातेधारकांना दिलासा! KYC Update नाही केलं तर बँक खाते होणार बंद?

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

0 37

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (Governor of the Reserve Bank) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील एक घोषणा आहे, केवायसी (KYC Update) अपडेटची. कोविड-१९च्या काळात दिलेला हा निर्णय नागरिकांची डोकेदुखी कमी करणार आहे. काय निर्णय दिला आहे ते आपण या लेखात जाणून घेऊ.

KYC नसेल तर ३१ डिसेंबरपर्यंत खाते बंद होईल? 

रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की, KYC अभावी ३१ डिसेंबरपर्यंत बँका कोणाचे खाते बंद करु शकणार नाहीत. वास्तविक, अशी अनेक प्रकरणे घडली आहेत ज्यात लोकांना कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी पैशांची आवश्यकता असते, परंतु त्यांचे खाते केवायसी न केल्यामुळे त्यांचे तात्पुरते बंद केले गेले. म्हणजेच ते खात्यातून पैसे काढू शकले नाहीत. अनेकदा खाते गोठवण्यापूर्वी कोणतीही सूचना दिली जात नाही. अशा खात्यांचे केवायसी अद्ययावत करण्यासाठी ४- ५ दिवस किंवा काही वेळा आठवडाही लागू शकतो. परंतु आता रिझर्व्ह बँकेच्या या नव्या आदेशानंतर त्यांचे खाते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत गोठवता येणार नाही.

Digi lockerच्या माध्यमातून केवायसी  

दरम्यान गव्हर्नरांनी खाते गोठले जाणार नसल्याचं सांगताना स्पष्ट केलं की,  ग्राहकांनी त्यांचे केवायसी अद्ययावत केले पाहिजे. सर्व डिजिटल चॅनेल केवायसी अद्यतनित करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, अशा प्रकारच्या बँक खाती आधार कार्डाच्या आधारे उघडली गेली. ज्यात ग्राहक आणि बँक कर्मचारी समोरा-समोर नसतात त्यांना मर्यादित केवायसी खात्यांच्या प्रकारात ठेवले गेले होते. आता अशी सर्व खाती पूर्ण केवायसीच्या प्रकारात येतील. इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे देखील केवायसीसाठी वैध असतील, तसेच डिजीलॉकरकडून जारी केलेले ओळखपत्र देखील वैध ओळखपत्र मानले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.