Redmi Note 10 च्या खरेदीवर १० हजारांचा फायदा, ३ हजारांचा कॅशबॅक

शाओमी कंपनीची सब ब्रँड कंपनी रेडमीचा नुकताच लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन Redmi Note 10 चा आज भारतात सेल आहे. या सेलला आज दुपारी १२ वाजता खरेदी करता येऊ शकते. या फोनच्या खरेदीवर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

0 41

हायलाइट्स:

  • Redmi Note 10 स्मार्टफोनचा आज सेल
  • फोनच्या खरेदीवर १० हजारांचा फायदा, ३ हजारांचा कॅशबॅक
  • या फोनची अॅमेझॉन इंडिया आणि mi.com विक्री

नवी दिल्लीःRedmi Note 10 स्मार्टफोन खरेदी करण्याची आज आणखी एक संधी आहे. जर तुम्हाला मागच्या सेलमध्ये हा जबरदस्त फोन खरेदी करता आला नसेल तर आज दुपारी १२ वाजता या फोनला अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वरून हा फोन खरेदी करता येऊ शकतो. सेलमध्ये फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटला उपलब्ध करण्यात आले आहे. फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.

या सेलमध्ये फोनला अनेक ऑफर्स सोबत खरेदी करता येऊ शकते. mi.com वरून फोन खरेदी केल्यास जिओ युजर्संना ३४९ रुपयांचा रिचार्ज केल्यावर १० हजार रुपयांचे बेनिफिट मिळणार आहेत. तर अॅमेझॉन वरून फोन खरेदी केल्यास जिओ युजर्संना ३ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. फोनला तुम्ही आकर्षक नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता.

फोनचे फीचर्स
या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा AMOLED डॉट डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ६७८ चिपसेट दिला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक पोर्ट्रेट लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

ड्यूअल नॅनो सिम आणि ५१२ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला ३३ वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.