Yavatmal Crime: १४ तोळे सोन्यासाठी लग्न मोडले; तरुणीने ‘अशी’ घडवली अद्दल

Yavatmal Crime: १४ तोळे सोन्यासाठी लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून वरासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 37

यवतमाळ: लग्न जुळल्यानंतर सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरही १४ तोळे सोन्याची अट घालून लग्न मोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी वडगाव येथील फसवणूक झालेल्या तरुणीने अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर वरासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Yavatmal Crime Latest Update )

वडगाव परिसरातील दीपनगर येथील तरुणीचा विवाह नागपूर येथील सागर भाऊराव पिंपळकर (३२) रा. नंदनवन याच्याशी जुळला होता. १२ जुलै ते १४ डिसेंबर २०२० या कालावधीत भावी नवरदेवासह सहा जणांनी विविध मागण्या सुरू केल्या. मागणी पूर्ण केली नाही तर लग्न मोडू, अशी धमकी त्यांच्याकडून दिली जात होती. दरम्यान, मुलीच्या पित्याकडे १४ तोळे सोन्याची व लग्न नागपूरमध्ये करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मागणी पूर्ण केली नाही तर हे लग्न होणार नाही, असेही धमकावण्यात आले.

तरुणी पोहचली थेट पोलीस ठाण्यात…

मुलीचा वडील असल्याने व लग्न मोडू नये म्हणून सतत होणाऱ्या मागण्यावर नमते घेत त्या पूर्ण करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही नवरदेवासह अन्य नातेवाईकांचे समाधान झाले नाही. त्यांच्या मागण्या सुरूच होत्या. त्यात अचानक १४ तोळे सोन्याची अट घालून लग्न मोडून फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने थेट अवधूतवाडी पोलीस स्टेशनला धाव घेतली व सहा जणांविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमांन्वये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.