ग्राम पंचायत कोरोना संमिती तसेच कर्मचारी यांना सुरक्षा कवच मिळण्याबाबत.

0 42

-साठगांवच्या सरपंच सौ.प्रिती दिडमुठे यांची मागणी
– पालकमंत्री यांना दिले निवेदन.

साठगांव हे गांव चंद्रपूर, नागपूर व भंडारा या 3 जिल्ह्याच्या सीमेवर असून जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गावपातळीवर कोरोना काळामध्ये जिवाची पर्वा न करता कोरोना चा प्रादुर्भाव गावात वाढु नये, तसेच कोरोना बाधित गांव होऊ नये यासाठी गावामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम गावपातळीवर कोरोना समिती तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तथा पदाधिकारी करत असतात.
गावात रोज कोरोनाबधित रुग्ण आढळत असून गावात कोविड सेंटर नसल्यामुळे बरेचसे पाझेटिव्ह रूग्ण घरीच विलगिकरन आहेत. अशा रूग्णां प्रती जनमानसात वेगळी भावना असल्यामुळे कोरोना बाधीत रूग्न ज्याठिकाणी आहेत त्याठिकाणी जाऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रकृतीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी गांव कोविड समिती व ग्रामपंचायत कर्मचारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धोका पत्करून घरोघरी जावून भेटी देत आहेत.
तेव्हा आपण आपल्या माध्यमातून साठगांव ग्रामपंचायत तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या तालुक्यातील ग्रामपंचायती मधील कोरोना समिती तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांना सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपयांचा विमा लागू करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन साठगांव च्या सरपंच सौ. प्रीतीताई दिडमुठे यांनी तहसीलदार संजय नागटिळक मार्फत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना देऊन मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.