मुंबई : 15 हजारापेक्षा कमी पगार असलेल्या कामगारांना सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ योजनेतील रजिस्ट्रेशनची नवी तारिख काय?

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची डेडलाईन पुढील वर्षी मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशनची अंतिम रारीख 30 जून 2021 ऐवजी आता 31 मार्च 2022 करण्यात आली आहे.

0 26

मुंबई : मागील वर्षी कोरोना संकटाच्या काळात औपचारिक क्षेत्रात रोजगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या विस्तारासाठी यावर्षीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 28 जून रोजी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यात आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची डेडलाईन पुढील वर्षी मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशनची अंतिम रारीख 30 जून 2021 ऐवजी आता 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. यात 15 हजारपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचारी, कामगारांसाठी फायदा होणार आहे. (Registration date of Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has been extended by one year)

भारत रोजगार योजना (ABRY)नुसार तिसरा टप्पा लॉन्च करण्यात आला आहे. या अंतर्गत 12 नव्या योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनांद्वारे देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यात नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून 27.1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेनुसार रजिस्ट्रेशनची तारीख वाढवल्यामुळे औपचारिक क्षेत्रात 71.8 लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर योजनेचा अंदाजित खर्च वाढून 22 हजार 98 कोटी रुपये झालाय. एबीआरवाय नुसार ईपीएफोमध्ये नोंदणीकृत आस्थापना आणि त्यांचे 15 हजारापेक्षा कमी पगार असलेल्या नव्या कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या अंशदानात वाढ होणार

ABRY नुसार केंद्र सरकार कर्मचारी आणि मालकांचे अंश (उत्पन्नाच्या 24 टक्के) किंवा कर्मचाऱ्यांचा अंश (उत्पन्नाच्या 12 टक्के) ची रक्कम दोन वर्षांपर्यंत प्रदान केली जाईल. मात्र हे EPFO नोंदणीकृत कंपन्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. ABRY नुसार 18 जून 2021 पर्यंत 79 हजार 557 कंपन्यांद्वारे 21. 42 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.

लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही!

कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यासाठी सरकार बरेच प्रयत्न करीत असून या प्रयत्नांचा परिणामही आता दिसून येत आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लसीकरण वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत कंपन्या आता बर्‍याच घोषणा करीत आहेत. कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, अशा सूचना देत आहेत, जेणेकरून ते आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावून काम सुरु करु शकतील. दरम्यान आता कंपन्यांनी लस न घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या पगाराच्या वाढीबाबत काही घोषणा देखील केल्या आहेत. (get your Corona vaccination at earliest otherwise loose your salary or increment)

देशातील सर्वात जुनी लॉ कंपनी खेतान अँड कंपनीने एक वेगळीच घोषणा केली आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनीने स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल, त्यांना पगारवाढ दिली जाणार नाही. जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी लस वेळेवर घ्यावी, यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.