अमरावती : दोन महिलांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात उद्रेक; पोलिसात तक्रार दाखल

उपचारादरम्यान दगावलेल्या दोन महिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 4

उपचारादरम्यान दगावलेल्या दोन महिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.

वलगाव मार्गावर डॉ. सोहेल बारी यांचे बेस्ट हॉस्पिटल आहे. याठिकाणी अचलपूर येथील शबाना अंजुम नियाजोद्दीन (४२) व त्यांची आई बशीदा खातून शेख हबीब (६०) यांना २७ मे रोजी दाखल केले होते. यातील बशीदा खातून यांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान तर त्यांची मुलगी शबाना अंजुम यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबतची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने नातेवाइकांना दिली. यानंतर नातेवाइक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे दार, काच, खिडकी व अन्य साहित्यांची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनतर दोन्ही महिलांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, मोहम्मद इरफान व वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अलीम पटेल यांनी याप्रकरणी बेस्ट रुग्णालयाविरोधात तक्रार दिली आहे. तर डॉ. बारी यांनी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली आहे.
 

Leave A Reply

Your email address will not be published.