Sachin Tendulkar : ‘क्रिकेटचा देव’ मदतीला धावला; ‘मिशन ऑक्सिजन’साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

सचिन तेंडुलकरची १ कोटीची मदत

1 22

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे… हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत… त्यामुळे एकूणच देशात गंभीर वातावरण आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत. Sachin Tendulkar Donates INR 1 Crore to ‘Mission Oxygen’ to Procure Oxygen Concentrators

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं ‘Mission Oxygen’ या उपकरर्मात सहभाग घेतला आहे आणि त्यानं स्वतः १ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानं इतरांनाही या चळवळीत हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून दुःख होत आहे. २५०+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत.”

सचिननं त्याच्या पोस्टमध्ये त्यानं किती मदत केलीय हे जाहीर केलं नसलं तरी इंग्रजी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्यानं १ कोटी दान केल्याचे समजते. IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

सचिननं नुकतीच कोरोनावर मात केली आणि या व्हिडीओत त्यानं त्याचाही उल्लेख केला. तो म्हणाला,”मागील महिना माझ्यासाठी खडतर होता. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मी २१ दिवस आयसोलेट झालो.’तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ… त्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि मला बरं केलं. या सर्वांचे खूप खूप आभार. ”

1 Comment
  1. Sunny says

    Pardeshi cricketer dan detayet aani ha det navhta mhanun lokanni tufhan tika kelyanantar suchlele akdam chhotese aani sankuchit shahanpan

Leave A Reply

Your email address will not be published.