एका सलमानमुळं बदललं दुसऱ्या सलमानचं आयुष्य; संघर्ष ऐकून भाईजानही भावुक

सलमानची आई आहे या सलमानची फॅन; सलमाननं आईसाठी दिलं त्याला बॉलिवूडचं तिकिट

0 1

मुंबई सलमान खानला (Salman Khan)अनेक नवोदित कलाकार आपला गॉडफादर मानतात. आजवर त्यानं ऐश्वर्या राय (Aishwarya rai), कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलीन फर्नांडीस, पुलकित सम्राट यांसारख्या अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळंच त्याला अनेक जण बॉलिवूडचा भाईजान असंही म्हणतात. याच यादीत आता आणखी एक जोडलं गेलं आहे. सलमान अली (Salman ali) या इंडियन आयडलमधील  (Indian Idol) स्पर्धकाला त्यानं आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. त्याचा अनुभव ऐकून स्वत: भाईजान देखील भावूक झाला.

अलिकडेच इंडियन आयडलच्या मंच्यावर अभिनेता सलमाननं हजेरी लावली होती. अन् याच ठिकाणी सलमान अली यानं गाणं गाऊन सलमानला आश्चर्यचकित केलं. त्यावेळी त्यानं बॉलिवूडमध्ये दिलेल्या संधीसाठी भाईजानचे आभारही मानले. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यातलं पहिलं गाण मी सलमान खान यांच्यासाठी गायलं. ‘दबंग 3’साठी मी हे गाणं गायलं होता.

संगीतकार वाजीद खान यांचा मला फोन आलेला, की सलमानसाठी गाण गाशील का? त्यावेळी मी एका शूटमध्ये होतो. हा फोन ठेवताचक्षणी मी शूट सोडलं, तिथल्या स्पॉटबॉयची गाडी घेतली आणि धडक निघालो. बाहेर खूप पाऊस होता, पण मी काही वेळातच त्या स्टुडीओमध्ये पोहोचलो. पुढल्या 15 मिनिटांत ते गाणं रेकॉर्ड केलं.”

त्याचा हा अनुभव सलमान देखील भावूक झाला. अन् त्याला संधी देण्याचं खरं कारण सांगितलं. सलमानची आई इंडियन आयडल या शोची फॅन आहे. या शोच्या 13 व्या पर्वात तिनं सलमानला गाताना पाहिलं होतं. त्याचा आवाज ऐकून ती त्याची फॅन झाली. त्यानं आपल्या मुलासाठी एखादं गाणं गावं अशी तिची इच्छा होती. अन् आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी सलमाननं गायक सलमानला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.