वादळापूर्वीची शांतता! शनिवारच्या दौऱ्यापूर्वी फेसबूक पोस्टद्वारे संभाजीराजेंचे पुन्हा संकेत!

'मराठा क्रांती मूक आंदोलन वादळा पुर्वीची ही शांतता' असं या पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसंच समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा! असं म्हणत आणखी एकदा संभाजीराजेंनी लोकप्रतिनिधींना आवाहन केलं आहे.

0 5

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुढाकार घेतलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी या मुद्द्यावरून वारंवार सरकार आणि लोकप्रतिनिधींनी आवाहन केलं आहे. सर्वांनी मिळून जबाबदारी घेऊन समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यानं संभाजीराजे यांच्याकडून आणखी एक इशारा सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून संभाजीराजेंनी आंदोलनाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, संभाजीराजे शनिवारी कोपर्डी आणि काकासाहेब शिंदेच्या स्मृतीस्थळी भेट देणार आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राजर्षी शाहू छत्रपती यांच्या समाधीचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्यांनी लिहिलेला संदेश हा आगामी काळातील आंदोलनाचे संकेत देणारे आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठा क्रांती मूक आंदोलन ही वादळा पुर्वीची ही शांतता असं या पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

तसंच समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा! असं म्हणत आणखी एकदा संभाजीराजेंनी लोकप्रतिनिधींना आवाहन केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा क्रांती मूक आंदोलन ही वादळा पुर्वीची ही शांतता होती असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी आंदोलनाचं वादळ येण्याचे संकेत दिलेत का? असं म्हटलं जात आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी 16 तारखेला मूक आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र त्यापूर्वी शनिवारी संभाजीराजे हे दुपारी कोपर्डी येथील स्मृतीस्थळाला भेट देण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व समन्वयकांसह ते काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळास भेट देणार आहेत. त्यामुळं 16 तारखेला होणाऱ्या आंदोलनाची तयारी आणि नियोजन शनिवारपासून सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता राज्य सरकार याबाबत काय विचार करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.