अंडरवर्ल्डचा ‘तो’ कॉल ठरला संजय दत्त आणि गोविंदाच्या मैत्रीला तडा जाण्याचे कारण

'एक और एक ग्यारह' चित्रपटाच्या वेळी देखील त्यांच्यामध्ये वाद झाला होता.

0 36

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील दोन नावं म्हणजे अभिनेता संजय दत्त आणि अभिनेता गोविंदा. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्त आणि गोविंदा यांच्यामध्ये मैत्रीचे चांगले नाते होते. त्यावेळी अनेक चित्रपट निर्माते त्या दोघांसोबत काम करण्यासाठी उत्सुक होते. पण एकदा असे काही झाले की त्या दोघांच्या मैत्रीला तडा गेला.

दिग्दर्शक डेविड धवन यांच्या ‘एक और एक ग्यारह’ चित्रपटात गोविंदा आणि संजय दत्त एकत्र काम करत होते. या चित्रपटातील एका सीनमध्ये गोविंदाला बदल करायचा होता. पण डेविड धवन यांनी बदल करण्यास नकार दिला. जेव्हा संजय दत्तला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याने डेविड धवन यांची बाजू घेतली.

संजय दत्तने जेव्हा डेविड धवन यांची बाजू घेतली तेव्हा गोविंदाला प्रचंड राग आला. त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण गोविंदाने संजयसोबत ‘एक और एक ग्यारह’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. चित्रीकरण संपल्यानंतर दोघांमध्ये पहिलेसारखे मैत्रीचे नाते राहिले नव्हते. त्यांचे एकत्र फिरणे, एकत्र चित्रपटात काम करणे कमी झाले होते.

त्यानंतर संजय दत्तचं एक फोन रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या रेकॉर्डिंगमध्ये संजय दत्त अंडरवर्ल्डमधील एका व्यक्तीशी बोलत होता. त्यावेळी त्याने गोविंदाचा उल्लेख करत तो सेटवर नेहमी उशिरा येतो असे म्हटले होते. त्याचसोबत काही अपशब्द देखील वापरले होते. त्यानंतर गोविंदा आणि संजय दत्त कधीही एकत्र दिसले नव्हते असे म्हटले जाते.

गोविंदा आणि संजय दत्तने ‘हसीना मना जाएगी’, ‘जोड़ी नंबर १’, ‘दो कैदी’, ‘एक और एक ग्‍यारह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी संजय आणि गोविंदाची जोडी हिट होती. अनेक निर्मात्यांना त्या दोघांसोबत काम करण्यासाठी इच्छा होती.

Leave A Reply

Your email address will not be published.