“आता तरी शहाणे व्हा! देशभर चिता जळत आहेत, त्या चितेत राजकारण जाळून टाका” संजय राऊतांचे भाजपला आव्हान

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी पहिला डोस संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विरोधकांवर चांगलाच निशाण साधला आहे.

त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे. तसेच, देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्याला भाजपकडून काय प्रतिउत्तर येत हे पाहण गरजेचं ठरणार आहे. तसेच राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.