काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर

प्रशासनच कोरोना (coronavirus pandemic) परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे एकदम चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार गावपातळीवर विलगीकरण कक्ष (isloation center) व कोविड सेंटर्सची (covid19 hospitals) उभारणी केली असती, तर जिल्ह्यातूनच कोरोना कधीच हद्दपार झाला असता, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

0 5

कोरेगाव (जि. सातारा) : ज्यांच्या हातात जिल्हा आहे, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असे महसूल, ग्रामविकास, पोलिस आणि आरोग्य विभागाचे प्रमुख हे केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे नाचविण्याचे काम करत आहेत. प्रशासनच कोरोना (coronavirus pandemic) परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे एकदम चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार गावपातळीवर विलगीकरण कक्ष (isloation center) व कोविड सेंटर्सची (covid19 hospitals) उभारणी केली असती, तर जिल्ह्यातूनच कोरोना कधीच हद्दपार झाला असता, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. (satara-news-do-not-blame-leaders-says-shashikant-shinde-covid19-koregoan)

जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी कोरोनाच्या लढ्यात कमी पडल्याचे बोलले जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना शशिकांत शिंदे म्हणाले, “”काही महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित होतो. एका अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे मी खबरदारीचा उपाय म्हणून होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही. प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला. आम्ही वेळोवेळी सूचना करूनही प्रशासनाने त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यांनी केवळ रिपोर्टिंग करत बैठकांचे फार्स केले. त्यातून काहीही निष्पिन्न झाले नाही. शेवटच्या क्षणी कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आता लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडणे चुकीचे आहे.”

जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हातात जिल्हा आहे. ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असे अधिकारी कितीवेळा जिल्हा फिरले. जम्बो कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर्सला भेटी दिल्या. ते स्वत: ऑन फिल्ड उतरले नाहीत. केवळ कागदोपत्री कामकाज केले. त्यांचेच अनुकरण हे प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी केले. गावपातळीवर, वाडीवस्तीवर जाऊन त्यांनी कामच केले नाही. कोरोनाविषयक सगळी कामे ही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा सेविकाच करत होत्या, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.