बच्चू कडूंची कामगिरी पाहून, मुख्यमंत्र्यांनीही केले तोंडभरून कौतुक; म्हणाले..

0 3

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात ६०० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.१३) उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे तोंडभरुन कौतुक केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेत शिवारातील पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांसाठी कळीचा प्रश्न असल्याने त्याची तीव्रता जाणून बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यात पाणंद रस्त्याचे जाळे तयार करण्यासाठी प्रयत्न केले ही संकल्पना ऐतिहासिकच नाही तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी ठरेल.”

तसेच, शेतमाल बाजारपेठांपर्यंत नेणे सोयीचे होण्यासाठी ग्रामस्थ, मंडळस्तर आणि तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे. यासोबतच, त्रिस्तरीय समिती निर्माण करण्याचा निर्णय होताच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना तिन्ही स्तरावर पुरस्कार दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या पाणंद रस्त्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांच्या आमदार निधीतून १ कोटी ४४ लाख ४३ हजार ५६० रुपये निधी या कामासाठी दिला आहे. या व्यतिरिक्त पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून ५ कोटी ६० लाख रुपये तसेच मनरेगातून ४ कोटी २ लाख रुपये निधी पाणंद रस्त्यांसाठी मिळवून देण्यात आला आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यात पाणंद रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.