शेअर बाजाराला युद्धाचा मोठा फटका; सेन्सेक्स 52805 वर, तर निफ्टी 430 अंकांनी कोसळला

आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला आहे.

0

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. याचा फटका भारतासह जगभरातील अन्य शेअर बाजारांना बसत आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला आहे.

पहिल्या पंधरा मिनिटांनंतर सेन्सेक्स 1573 अंकांनी घसरला असून तो 52760 च्या पातळीवर ट्रेड करत आहे तर निफ्टीमध्येही आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तब्बल 437 अंकांनी कोसळून 15808 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.