कोरोना बाधितांच्या आकडेवाडीत महाविकास आघाडीकडून लपवाछपवी, किरीट सोमय्यांचा व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विट हँडल वरून एक ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, “वसई विरार शहरात १ ते १३ एप्रिल काळात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण महानगरपालिकेने फक्त २३ मृत्यू दाखवले आहेत. चालू वर्षात जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत कोरोनाने २९५ जणांचा बळी घेतला असताना महानगरपालिकेने केवळ ५२ मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने २४३ कोरोनाबळी लपवल्याचे स्पष्ट झाले आहे.”

यावर वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी म्हणाले की, “महानगरपालिकेच्या दैनंदिन अहवालात शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद केली जात नव्हती. केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद या अहवालात होते. पण, खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही यापुढे अहवालात करण्यात येईल.”

दरम्यान, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या हाफकिन संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन ५६५ मध्ये खरेदीचा निर्णय घेतला. तर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकने या इंजेक्शनची खरेदी १५६८ रुपयात केली. एवढी तफावत का, यांची चैाकशी केली पाहिजे.” ठाकरे सरकार स्वतःच ब्लॅकमार्केटिंग करीत आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.