शेगांव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जंयती उत्साहात साजरी

0 15

शेगांव :
श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर माटरगाव येथे दि.३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंती आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी दिवे प्रज्वलीत करून व सामुदायिक प्रार्थना करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थना करून जंयती उत्साहात साजरी करतांना गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते.

याप्रसंगी गुरूदेव मंडळाचे कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून पूजन केले, यावेळी मंडळाचे सन्मानीय सदस्य रामकृष्ण मार्के,गजानन काळे ,मनोहर सरोलकर, राम दादा,अशोक निखाडे,एकनाथराव शेंगोकार, संजय मुरे,प्रल्हाद वाघ,ज्ञानदेव लोड,अण्णासाहेब देशमुख,अतुलबापू देशमुख,शेगांव तालुका भजन प्रमुख रमेश निखाडे,व इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा पूजन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन केले.

प्रार्थनेचे महत्व या विषयावर मनोहर कुसुम्बये यांनी दोन शब्द बोलून कार्यक्रम कोरोनाच्या काळात सोशल अंतर ठेवून थोडक्यात संपन्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.