शेगांव : मच्छिद्रखेड येथे कोरोना संसर्ग लसीकरणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 0

शेगांव : मच्छिद्रखेड येथे कोरोना संसर्ग लसीकरणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

९३ लाभार्थ्यानी करून घेतले कोरोना प्रतिबंधक लसीकरण

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत ग्राम मच्छिद्रखेड येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले.
४५ वयोटापेक्षा जास्त वयोगटातील एकुण ९३ लाभार्थ्यानी या कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
या लसीकरण शिबिराकरिता डाॅ.एल.डब्ल्यू. राठोड, आरोग्य सेविका अंजली सोनार,श्री.इंगोले साहेब,एस.आर.भोंबळे,आशा वर्कर सुनिता ससाने, मदतनीस भांरबे शिक्षक मंगेश साबळे, तलाठी बुरजे साहेब,डाबेराव साहेब सरपंच भांरबे उपसरपंच खंडारे व ग्रामपंचायत सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन लसीकरण शिबिर यशस्वीपणे पार पाडलेले आहे.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाकरिता सज्ज असलेले उपस्थित आरोग्य विभागातील कर्मचारी

 

Leave A Reply

Your email address will not be published.