शेगांव : डोलारखेड येथे कोरोना संसर्ग लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

७४ ग्रामस्थांनी करून घेतले कोरोना प्रतिबंधक लसीकरण

0 0

शेगांव
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या उपकेंद्र डोलारखेड येथे कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्डचे लसीकरण डॉ.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि १० एप्रिल रोजी संपन्न झाले.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाचा वय ४५ ते ५९ या वयोगटातील एकूण ४० लाभार्थ्यानां व ६० वर्ष व त्यापुढील वयोगटातील एकूण ३४ लाभार्थ्यानां असे एकूण ७४ लाभार्थ्यानां कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आलेला आहे.

याप्रसंगी ए.एन.एम बुटे,आरोग्य सेविका पुष्पा देठे,आर.पी.निखाडे,तुषार भांडे,ग्राम पंचायत कर्मचारी मंगेश देठे व आदी आरोग्य विभागातील कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.