जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांतारामभाऊ दाणे यांचा सत्कार

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांतारामभाऊ दाणे यांचा शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांच्या हस्ते सन्मान

0

शेगांव :

जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा शासन निर्णयानुसार निर्माण करण्यात आलेली आहे.

या जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांतारामभाऊ दाणे यांची निवड झाल्याबद्दल हाॅटेल आठवण येथील प्रांगणामध्ये शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी वाढदिवसाचे औचित्य साधुन शांतारामभाऊ दाणे यांनी शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेच्या वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख उमेश पाटील,अमोल चव्हाण,संग्रामपुर तालुका अध्यक्ष गजानन वानखडे,अंनतराव तराळे,राजुभाऊ घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.