फडणवीसांचे जवळचे मंत्री लेडीज बारमध्ये जातात; त्यामुळे त्यांनी मला सल्ला द्यायची गरज नाही

0 3

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
बुलडाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर गायकवाड राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. मात्र राज्यातील इतर भाजप नेत्यांनी गायकवाड यांच्या टिकेचा समाचार घेतला. त्यानंतर पुन्हा गायकवाड यांनी आपल्या आरोपावर ठाम राहत पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका करताना गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी संजय गायकवाड म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा. फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात.” असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका करताना केला आहे.

याअगोदर, “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते.” असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले होते.

दरम्यान, “नितेश राणे हा बेडूक आहे. तो कोंबडी चोर देखील आहे. त्याला मी फोन देखील लावला होता. मात्र त्याचा फोन नाही लागला, नाहीतर त्याला मी जागेवरच सांगितले असते. परंतु त्याला मी ऊत्तर नक्कीच देणार आहे. मी मुख्यमंत्र्यांचा एक सहकारी आहे. मी त्यांच्या सहकाऱ्याच्या नात्याने यांना अंगावर घेतले आहे. नितेश राणे नेहमीच शेलक्या भाषेत टीका करत असतात. आज त्यांच्या भाषेत टीका केली तर त्यांचा तिळपापड होत आहे.” अशी टीका देखील आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर करताना, नितेश राणेंवर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.